सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे झाले नुकसान .. -आमदार साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधि)
विधानसभा मतदारसंघातील सर्वच महसूल मंडळांत दि. ६ जुलै ते २५ जुलै सतत पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्याने त्याअंतर्गत नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील व यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपत्तीसह कापसावर लाल्या, मररोग, अज्ञात रोग, बोगस बियाणे, बोगस औषधी व खत यामुळे किडींचा व मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रदुर्भाव झाला आहे, नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा करावा आणि शासन निर्णयातील १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीची अट शिथिल करावी, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान, फळपिके, वन शेती याची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.