नियमांचा भंग करणाऱ्या २० वाहनावर पोलिसांची कारवाई.

अमळनेर( प्रतिनिधि) अमळनेर येथे बेशिस्तपणे मोटरसायकल चालवून नियमांचा भंग करणाऱ्या सुमारे २० वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून १२ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे.
कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आपल्या पोलीस पथकाला वाहनांची तपासणी करून नियम न पाळणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. २७ जुलै रोजी सायंकाळी मंगलमूर्ती चौकात पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे , सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र कोठावदे , हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर , हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील , राहुल पाटील व दहा होमगार्ड यांनी वाहनांची तपासणी केली असता पाच जणाजवळ परवाने नव्हते , एकाने सीट बेल्ट लावला नव्हता , ट्रिपल सीट जाणारे तीन जण सापडले , नऊ वाहनांना नंबरप्लेट नव्हत्या , तर दोन वाहने नो पार्किंग मध्ये लावली होती. या सर्वांवर कारवाई करून त्यांच्याकडून १२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.