सायकलिंग का करावे..

24 प्राईम न्यूज 29 Jul 2023 सायकलिंग हे एक प्रकारचे कार्डियोवेस्कुलर वर्कआऊट आहे. सायकलिंग केल्याने ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते आणि कॅलरीजही बर्न होतात. कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या गाईडलाईन्सनुसार आठवड्यात कमीत कमी १५० मिनिटे तरी व्यायाम करावा. यात रनिंग, कार्डिओ एक्सरसाईज याबरोबरच सायकलिंग केल्याने आरोग्य निरोगी राहते.
-सोशल लाईफमध्ये सुधार
जर तुम्ही तुमच्या डेली रूटीनला कंटाळला असाल, तर सायकलिंगचा पर्याय जरूर निवडा. यामुळे तुमच्या सोशल लाईफमध्येसुद्धा सुधार होईल. तेथे तुम्हाला नवे मित्रमैत्रीणी भेटतील.
● तणावापासून दूर राहता
मल्टिटास्किंग महिला दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात तेवढ्याच त्या चिंतितसुद्धा असतात. अशातच तुम्ही थोडावेळ सायकलिंग करा. यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून दूर रहाल. या व्यतिरिक्त डिप्रेशन आणि एग्जायटीपासूनही दूर राहण्यास मदत होते.आत्मविश्वास वाढेल
सायकलिंगच्या माध्यमातून तुम्ही तंदुरस्तच नव्हे, तर तुमचा आत्मविश्वासही वाढला जाईल.
हृदयरोगांपासून दूर राहता
महिलांनादेखील हृदयासंबंधित तक्रारी असतात, अशावेळी दररोज केवळ ३० मिनिटे जरी व्यायाम केला तरी तुम्ही हृदयरोगांपासून दूर राहू शकता
रोगप्रतिकारक शक्तीसाठी
असे आपले वय वाढत जाते, तशी आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होऊ लागते, अशातच महिलांनी सायकलिंग केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत होईल.