ओसवाल जैन संस्थेतर्फे गुणगौरव समारंभ उत्साहात… -शिक्षणा सोबत संस्काराचा सिंचन संस्काराची बीजे जोपासली पाहिजे..
सुरेश अलीझाड.

अमळनेर (प्रतिनिधि) येथील श्री ओसवाल जैन संस्थेतर्फे10 वी 12 तसेच उच्चशिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा लायन्स हॉल ,जी एस हायस्कूल अमळनेर येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश जी अलिझाड चोपडा व प्रमुख पाहुणे राजेश मुनोत चेअरमन अहिंसा कॉलेज दोंडाईचा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात यशवंत व कीर्तीवंत होण्यासाठी राजेश मुनोत म्हणाले की विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षणाविषयी अद्यावत माहिती घेणे गरजेचे आहे, इंटरनेट मोबाईल व्हाट्सअप चे युगात आपला पाल्य कुठे भटकायला नको तेव्हा पालकांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ दिला पाहिजे तसेच बोलताना म्हणाले की विद्यार्थी स्वतःच्या कर्तुत्वाने आपली कीर्ती वाढवू शकतो यामुळे समाज त्यांच्या यशाचं कौतुक करेल तसेच शिक्षण कमी किंवा जास्त असले तरी स्वतःच्या आत्मबलाने सुसंस्कृत राहून आपण आपली प्रगती करू शकतो असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष घेवरचंद कोठारी व सेक्रेटरी प्राध्यापक सुभाषचंद्र ओसवाल यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.मान्यवरांचे स्वागत ऋषभ पारख यांनी केले प्रस्तावना सुभाषचंद्र ओसवाल माननीय अध्यक्ष यांचा परिचय भरत कोठारी व प्रमुख पाहूण्याचा परिचय रोनक संकलेचा व स्वागत गीत व सूत्रसंचालन सौ श्वेता कोठारी व सौ मीनाक्षी लूनावत यांनी केले तसेच आभार रोनक संकलेचा यांनी मानले.
कार्यक्रमास वालचंद पारख , सुभाषचंद कोठारी, प्रकाशचंद पारख, विजय पारख , विजय पारख, रमेशचंद कोठारी कैलास लोढा ,किरण वेदमुथा ,सुनील छाजेड, राजमल संचेती , भिकचंद छाजेड,जय कोठारी, देवराज बाफना, राजेश बेदमुथा धर्मेंद्र कटारिया, दिनेश कोठारी, कमलेश सेठिया, महावीर पहाडे, शितल कोठारी, सुरेशचंद लुनावत प्रतीक लोढा मांगीलाल गोलेछा भरत कोठारी तसेच इतर मान्यवर व समाजातील महिला व मुले मुली उपस्थित होते.