एरंडोल येथे मैत्री सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित निसर्ग सप्ताहा साजरा..

एरंडोल( प्रतिनिधि) येथे मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे निसर्ग सप्ताह साजरा करण्यात आला या उपक्रमात शहरातील सामाजिक कार्यकर्ते अधिकारी डॉक्टर्स प्राध्यापक समाजसेवक व अनेक वृक्षप्रेमी यांनी सहभाग नोंदवला या उपक्रमांतर्गत धरणगाव चौफुलीवर स्टॉल लावून रोपांचे वितरण करण्यात आले पोलीस निरीक्षक सतीश बोराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांच्या हस्ते रोपांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार चिमणराव पाटील व खासदार उमेश पाटील यांनी रोपांच्या स्टॉलला भेट देऊन फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले
या सप्ताहात १५०० रोपांचे वितरण करण्यात आले गोरक्षनाथ महाजन यांनी विशेष सहकार्य केले.