एरंडोल येथे महसूल यंत्रणेतर्फे महसूल सप्ताहाचा शुभारंभ.. -उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव…

एरंडोल( प्रतिनिधि ) येथिल महसूल यंत्रणेतर्फे एक ऑगस्ट२०२३ पासून महसूल दिन व महसूल सप्ताहस उत्साहात शुभारंभ करण्यात आला एक ऑगस्ट रोजी ग्रामीण स्तरावर विविध ठिकाणी ई पिक पाहणी करून तसेच कार्यालयीन स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सायंकाळी महसूल दिन व महसूल सप्ताहाची सुरुवात उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला
निवासी नायब तहसीलदार किशोर माळी नायब तहसीलदार दिलीप पाटील पुरवठा निरीक्षक संदीप निळे महसूल अहवाल कारकून मधुकर नंदनवार गोपाल शिरसाट उदय निंबाळकर सुवर्णा काळे मधुकर पाटील जितेंद्र बडगुजर प्रदीप पाटील दिलीप शिंदे हे गौरवाचे मानकरी ठरले.