तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी एमपीडीएची केली कारवाई..

अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर येथे तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली. त्याची पुणे येथील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.विशाल दशरथ चौधरी, वय-27 वर्ष याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सन 2016 पासून ते सन 2023 च्या ३१ जुलै पावेतो अनेक गुन्हेगारी कृत्य केले त्यात प्रामुख्याने बनावट विषारी दारू विकने

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे लुटमार करून जबर दुखापत करणे तसेच समाजात गुंडागर्दी करून दहशत निर्माण करणे आणि विशेषता हिंदू मुस्लिम जातीय तणाव निर्माण करून दंगल घडविणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले असून त्याच्यावर वेळोवेळी चांगला वागणुकीचे व प्रतिबंधक अनेक वेळा कारवाई करण्यात आल्या परंतु तो कायद्याला न घाबरता त्याने त्याचे गुंड प्रवृत्तीचे करत असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती आणि वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालने बाबतचा अधिनियम 1981 प्रमाणे विशाल दशरथ चौधरी यास पुणे येथील येरवडा सेंट्रल तुरुंगात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे, पोलीस उप निरीक्षक श्री विकास शिरोळे, श्री. अनिल भुसारे, पोलीस अमलदार किशोर पाटील, डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, सुनिल रामदास पाटील, घनशाम पवार, कैलास शिंदे, जितेंद्र निकुंभे, चालक मधुकर पाटील, योगेश श्रावण पाटील, सुनिल बभूता पाटील अशांनी कामगिरी बजावली