अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न..

0

अमळनेर(प्रतिनिधि) १ ऑगस्ट२०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व

पदाधिकारी व सदस्यांची मासिक बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
बैठकीच्या सुरुवातीला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक व तालुका पालक श्री मकसूद भाईंच्या यांच्या शुभहस्ते संघटनेचे संस्थापक कै. बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवीन आलेले सदस्य श्री शिवाजी पाटील व श्री महेश भाऊ पाटील यांचे स्वागत श्री मकसूद भाई यांच्या हस्ते करण्यात आले. सेक्रेटरी सौ कपिला मुठे यांनी संघटन मंत्राने सुरुवात करून बैठकीचे प्रस्तावित केले. त्यानंतर अमळनेर तालुका अखिल भारतीय पंचायतीच्या अध्यक्षा सौ. भारती अग्रवाल यांनी ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन , नवीन सदस्यता नोंदणी अभियान, सहयोग निधी संकलन इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या महिन्यात जास्तीत जास्त असतं सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले व उपस्थित सर्व सदस्यांनी निधीसंकलना करता प्रत्येकी ₹१०००/_देण्याचे व संपूर्ण सहयोग करण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे श्रीमती विमल मैराळे,श्री.गोकुळ बागुल , श्री.देविदास बिरारी आदी सदस्य उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन पंचायतीच्या कोषाध्यक्षा सौ. वनश्री अमृतकर यांनी केले बैठकीची सांगता शांती मंत्राने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!