रेल्वे मधील हत्याकांडाच्या मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई सह रेल्वे मध्ये नोकरी द्या.. – मुस्लिम मंच भुसावळ
शिष्ठ मंडळाची मागणी..

भुसावळ (प्रतिनिधि)
भुसावळ – जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये आर.पी.एफ. चेतन सिंग यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर असताना द्वेष बुध्दीने प्रवाशांची हत्या केली त्याचा तीव्र निषेध मुस्लिम मंच भुसावळ तर्फे केला गेला.
महाराष्ट्र शासनाने व रेल्वे तर्फे सुद्धा अजून कोणतीही कारवाई न झाल्याने शासन प्रणालीवर सुद्धा आक्षेप नोंदविण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच भारतीय रेल्वे मुंबई विभागाचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
१) मृत आरपीएफ सब इन्स्पेक्टर मीना यांना शहीद घोषित करून त्यांना मरणोत्तर पारितोषिक सह त्याच्या मुलास कायमस्वरूपी रेल्वेत नोकरी द्यावी
२) मृत पावलेले तीन प्रवासी अब्दुल कबीर भाई, अख्तर अब्बास अली, व मोहम्मद हुसेन यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसान भरपाई व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
३)आरोपी चेतन सिंग गोळीबार करताना उपस्थित इतर प्रवाशांना उद्देशून जे काही बोलत होता त्या वक्तव्यावरून त्याच्या मनात मुस्लिम समाजाबद्दल प्रचंड प्रमाणात द्वेष दिसून येत असल्याने त्याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे.
४) द्वेषपूर्ण भाषण देणारे तसेच धार्मिक व सामाजिक पुरुष यांची विटंबना करणारे यांच्यासाठी विशेष कायदा बनवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अशा पाच मागण्याचे निवेदन विभागीय अधिकारी भुसावळ यांना देण्यात आले.
त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले की आपल्या भावना शासनाला त्वरित कळवण्यात येतील.
शिष्टमंडळात यांचा होता समावेशसाबिर शेख माजी नगरसेवक सलीम पिजारी माजी नगरसेवकजुनेद अशरफ खान युसूफ खान मुस्लिम कब्रिस्तान अध्यक्ष मुझईद एम आई एम शहर अध्यक्ष यूनुस मामा शोएब भाईअल्पसंख्यक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नजर भाई सोहेल पठान डॉक्टर इमरान खान अकबर सर आईयूएमएल शाकिर पिंजरी आदि उपस्थित होते