भुसावळ विभागातील नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे भारत दर्शन गाडीचे स्वागत.. भारत गौरव ट्रेनचा प्रवास सत्य,प्रेम, करुणा, या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी…

भुसावळ (प्रतिनिधि)
आयआरसीटीसी द्वारे आयोजित भारत गौरव टुरिस्ट गाड्या प्रवाशांना एका असाधारण अध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातात व जय भारताला एकत्र आणतात व परंपरांचे संवर्धन करतात. भारत गौरव ट्रेनचा प्रवास प्रभू रामाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी आणि सत्य, प्रेम, करुणा या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या गहन दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. राम कथा वाचक पूज्य श्री मोरारी बापू, ज्यांच्या प्रवचनांनी लाखो लोकांच्या हृदयाला प्रेरणा दिली आणि रामचरित मानस कथनातून श्रोत्यांच्या आत्म्याला स्पर्श केला आहे पूज्य श्री मोरारी बापू 01 ऑगस्ट रोजी सहप्रवाशांसह पुण्यात आले आणि ते पवित्र ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर येथे पोहोचले जिथे श्री राम कथेचे आयोजन केले आहे. आणि पुण्याहून 2 ऑगस्ट रोजी नाशिकला जाऊन पवित्र ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतील.
आज दी -02.08.2023 रोजी भारत गौरव यात्रा गाडीचे नाशिक स्टेशन येथे आगमन झाले त्या गाडीतून सुमारे चारशे प्रवासी नाशिक स्टेशन येथे त्यांचे आगमन झाले. त्या सर्व प्रवाशांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले याप्रसंगी नाशिक रेल्वे स्टेशनवर सर्व सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी सहाय्यक वाणिज्य प्रबंधक श्री अनिल बागले, स्टेशन प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक ,आरपीएफ आणि सर्व स्टेशन स्टाफ उपस्थित होते.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराने ‘ एक भारत श्रेष्ठ भारत’आणि ‘देखो अपना देश’ अंतर्गत भारत पर्यटक गौरव ट्रेन सुरू आहे.