एरंडोलला सरस्वती कॉलनीत महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती कार्यक्रम..
-महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे-ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन..

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील सरस्वती कॉलनीत नुकताच महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांनी मासिक पाळीदरम्यान प्लास्टिक पॅड न वापरता वूई आर मोअरचे प्रोविंग्ज पॅड वापरून आरोग्याची आणि पर्यावरण संरक्षणाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वूई आर मोअर सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनीच्या ज्योती पाटील यांनी केले.
महिलांची मासिक पाळी, गर्भाशयाचे कर्करोग, पीसीओडी, ओटी पोट दुखणे आदी आजार, मासिक पाळी दरम्यान प्लास्टिक पॅड वापरून होणारे शरीराचे नुकसान आदींविषयी समस्या जाणून घेेवून ज्योती पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टिक पॅड वापरून आजारांना आमंत्रिक करतो त्यामुळे संपूर्णत: नैसर्गिक असे प्रोविंग्ज पॅड वापरून शरीराचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवला. तसेच या कंपनीचे प्रॉडक्टस् महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून महिलांच्या आरोग्यास पुरक असे उत्पादन केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शकुंतला अहिरराव, स्वाती पाटील, वैशालीताई, शकुंतला पाटील, उज्वला पाटील, सपना वानखेडे, माधुरी पाटील, सुनंदा मराठे, अन्नपुर्णा पाटील, रजनी काळे, अनिता चव्हाण, लता पाटील, शोभा पाटील, माधुरी भवार, गायत्री मोरे, रंजना पाटील, साबळेताई आदी उपस्थित होते.