मानव तस्करी प्रकरणी मौलाना अंजर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर,
जळगावकरांनी मौलानाचे केले स्वागत.

जळगाव ( प्रतिनिधी )
बिहार मधून सांगली येथे मदरसा शिकवणीसाठी घेऊन जात असलेले २९ मुलांना भुसावळ रेल्वे पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्टेशन ला उतरवून मौलाना अंजर मोहम्मद सय्यद यांच्यावर मानव तस्करीचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्

यांची जामीनावर मुक्तता झाली असता जळगावकरांच्या वतीने त्यांचे मिठाई व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी त्यांचे बंधू असगर व शालक मोहम्मद यांची उपस्थिती होती
उच्च न्यायालयात मानियार बिरादरीने दाखल केले होते अपील
भुसावळ रेल्वे कोर्ट व सेशन कोर्टात मौलाना ला जामीन मिळावा म्हणून भुसावळ येथील मुस्लिम मंच ने आवश्यक ती कारवाई केली होती परंतु त्या ठिकाणी जामीन न मिळाल्याने जळगाव जिल्हा मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी स्वखर्चाने औरंगाबाद खंडपीठातील एडवोकेट नसीम आर शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी मौलानाची जामिनीवर सुटका करताना आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले की लहान बालकांच्या पालकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून व मदरसाचे असलेले कागदपत्र बघता हा मानव तस्करीचा प्रकार नसल्याने मौलाना ला जामीन मजूर करण्यात येत आहे.
एफ आय आर रद्द साठी याचिका दाखल
मौलाना अंजर आलम यांचा जामीन मंजूर होताच त्वरित औरंगाबाद खंडपीठात भुसावळ रेल्वे पोलिसांनी दाखल केलेली मानव तस्करीची एफ आय आर रद्द करण्यात यावी यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरीने एडवोकेट नसीम आर शेख यांच्या माध्यमातून एफ आय आर रद्द ची याचिका दाखल केल्याचे मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी माहिती दिली
मौलाना अंजर साठी यांनी घेतले परिश्रम
औरंगाबादचे अडव्होकेट नसीम आर शेख,भुसावळचे इम्तियाज शेख,नदीम शेख, एडवोकेट एहतेशाम मलिक, शेख एजाज उर्फ सोनू भाई, समाजसेवक राम अवतार तर जळगावचे फारुक शेख,
मजहर पठाण,अमजद पठाण,अन्वर खान, फिरोज शेख,अनिस शाह,अडव्होकेट आमीर शेख, नशिराबाद चे महमूद शेख व अब्दुल रहीम टेलर आदींचे सहकार्य मिळाले.