एरंडोल येथे सकल मराठा समाजातर्फे मुक मोर्चाचे आयोजन…..

प्रतिनिधी ( एरंडोल ) येथील सकल मराठा समाजा तर्फे भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणी व खडके येथील आश्रम शाळेतील झालेल्या अत्याचार प्रकरणी दि. ०८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा होळी मैदान गांधिपुरापासून बुधवार दरवाजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भगवा चौक, मारवाडी गल्ली, अमळनेर दरवाजा,

, नागोबा मढी, महात्मा फुले पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रा.ती. काबरे विद्यालय मार्गे तहसील कार्यालय येथे समारोप होऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे आयोजक सकल मराठा समाज अध्यक्ष सोमनाथ मराठे , मनोज मराठे , गणेश मराठे, सुभाष मराठे अमोल मराठे रामकृष्ण मराठे सुनील पाटील पद्माकर मराठे सुभाष मराठे पंकज पाटील अनिल मराठे समाधान मराठे रवींद्र मराठे भूषण मराठे महेश मराठे आदींनी नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.