राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व भारत मुक्ती मोर्चा तर्फे समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिव्हिल कोड) व जळणा-या मणिपुरच्या विरोधात भारत बंद….

जळगाव ( प्रतिनिधी ) समान नागरी संहिता(युनिफॉर्म सिव्हिल कोड)व मणिपुर येथील आदिवासी महिलांची धिंड काढुन त्यांच्यावर माणुसकीला काळे फासणा-या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व भारत मुक्ती मोर्चा या संघटनांनी दि.७ ऑगस्ट रोजी भारत बंद एच.एन.रेकवाल(राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद) यांच्या नेतृत्वाखाली व वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) यांच्या मार्गदर्शनाखाली पुकारण्यात आला आहे. आज जळगावात या घटनांच्या संदर्भात भारत बंदच्या अंतर्गत चक्काजाम आंदोलन आकाशवाणी चौकात करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व गफुर तडवी (जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,)व देवानंद निकम (जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आर.एस.एस.व भाजपा जवळ निवडणुका जिंकण्याचा कोणताच मुद्दा शिल्लक नाही,तसेच जनतेसाठी ९ वर्षात काय भरीव काम केले याचे उत्तर नसल्याने समान नागरी कायद्याचे पिलू सोडण्यात आले आहे
आदिवासींना विस्थापित करण्याच्या षडयंत्रामागचे गौडबंगाल…
आदिवासी हे स्वतंत्र व स्वायत्त आहेत.३७१ कलमामुळे गैरआदिवासी आदिवासी बहुल भागात जमीन,जायदाद,जंगम मालमत्ता खरेदी करु शकत नाही.आदिवासी ज्या भागात वास्तव्यास आहे.तो भाग खनिजद्रव्यांनी संपन्न भुभाग आहे.हा भुभाग धनदांडगे,भांडवलदार यांना हवा आहे.परंतु याला ३७१ कलम अडसर आहे.आदिवासींवर हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राम्हणत्व थोपवले जात असुन त्यांची स्वतंत्र ओळख व अस्तित्व संपवण्याचे षडयंत्र आखले जात आहे.
युनिफॉर्म सिव्हिल कोड जर लागु करण्यात आला तर या कायद्यामुळे मुसलमानांपेक्षा जास्त झळ ही आदिवासींना बसणार आहे.
संविधानात अंतर्भुत असलेली ५ व ६ वी सुची,अनुच्छेद २४४,३७१ यामुळे आदिवासी समुहाला संविधानाने स्वतंत्र ओळख व स्वायत्तता दिलेली आहे.त्याचप्रमाणे संविधानाने आदिवासी समुदायाचे हक्क,अधिकार, स्वतंत्रता, स्वायत्तता, आदिवासी संस्कृती व आदिवासींची स्वतःची ओळख अबाधित राखण्यासाठी कस्टमरी लॉ ची निर्मिती करुन आदिवासी समुहाला घटनात्मक संरक्षण दिलेले आहे. समान नागरी कायदा जर लागु झाला तर हे सर्व घटनात्मक अधिकार बाधित होण्याची शक्यता आहे.
समान नागरी कायदा जर लागु झाला तर अनु.जाती,भटके विमुक्त,इतर मागास वर्ग यांना मिळालेले सर्व संवैधानिक हक्क व अधिकार संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
शिख, मुस्लिम, ख्रिश्चन,बौध्द,जैन व इतर धार्मिक अल्पसंख्याक समुदायांना संविधानाने संरक्षित केलेले विवाह,घटस्फोट,रुढी,परंपरा,वारसहक्क, धार्मिक विधी,धार्मिक संस्कार व अशा अनेक अधिकार नष्ट होण्याची शक्यता आहे.
मणिपुरची घटना… भारताच्या दैदिप्यमान इतिहासाला लागलेला कलंक…
“रोम जळत असताना निरो राजा बासरी वाजवत होता.” हा इतिहास आपण वाचत आलो आहोत.मात्र याची प्रचिती भारतावर कधी येईल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढुन त्यांच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला.हा काळाकुट्ट अमानवीय प्रकार ७७ दिवसानंतर उजेडात आला.यामुळे मानवजात शर्मसार झाली.गेली ३ महिने मणिपुर जळत आहे.तरीही देश चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी मौन धारण केले आहे.
या सर्व बाबींविरोधात आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व भारत मुक्ती मोर्चा व जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटनांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात चक्का जाम केला.यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला.
या भारत बंदमध्ये प्रतिभा उबाळे,सुमित्र अहिरे,मोहन शिंदे,एड.रणजित तडवी, मनीयार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख,सैयद चांद, अकील मणियार, जाकीर तडवी, खुमानसिंग बारेला,ताराचंद भिल,प्रमोद पोहेकर,राजु खरे,सुनिल देहडे,विजय सुरवाडे,सुकलाल पेंढारकर,प्रमोद सौंदळे,नितीन गाढे, हर्षवर्धन तायडे,खुशाल सोनवणे,भगवान कांबळे,संजय कदम,भागवत सुतिर,किरण बि-हाडे,गौतम मगरे, महेंद्र जोहरे,रवी भील,गोपाळ कोळी,भिका कोळी, नारायण सोनवणे,योगेश सोनवणे,डॉ.शाकीर शेख, इरफान शेख,आशिफ तडवी,अमन तडवी,जुबेर तडवी,वसीम तडवी,सागर तडवी,दादाभाऊ तडवी,अकीलभाई,विजय निकम, नागराज ठिवरे, प्रद्युम्न वारडे, आर.बी.परदेशी, तावडे,रविंद्र गायकवाड,अशोक ब्राम्हणे,मंगल निकम, पंकज तायडे,भालेराव,सुरेश सपकाळे, सिध्दार्थ सोनवणे,जगदीश सपकाळे, डॉ.सोनवणे, ईसा तडवी, संजय तडवी,नंदलाल आगारे, उज्ज्वला इंगळे,प्रज्ञा बागुल, कल्पना सपकाळे, संगिता देहडे,अनिता पेंढारकर,माया खंडारे,ज्योती सोनवणे, संध्या कोचूरे,छाया पाटील, सखुबाई धनगर, प्रतिमा धनगर,सुनिता पवार,सीमा तायडे, मोनाली साबळे, सरुबाई साळवे,जनाबाई सोनवणे,आदि शेकडो बहुजन कार्यकर्ते उपस्थित होते.