जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावा..
डॉ.राम पुनियानी.

अमळनेर ( प्रतिनिधि )
अमळनेर येथे दोन दिवशीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विचारवंत व अभ्यासक डॉ.राम पुनियानी यांनी सांगितले. धर्म , इतिहासातील तत्थ, विविध धार्मिक व जातीय शोषण या बाबतीत संवाद साधला. राग,द्वेष,हिंसा, दहशतवाद हे कोणत्याही धर्माचा भाग असू शकत नाही.असे मांडताना कोणत्याही व्यक्ती व मानवतेवर. अन्याय न होता एक़ोपा टिकविणे , वाढविण्यासाठी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य ,समता व बंधुता यांची जोपासना केली तर जातीय सलोखा वाढून भारत राष्ट्र मजबूत व अधिक प्रगत व्हायला लागेल.
कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी डाॅ अनिल शिंदे यांनी खंत व्यक्त केली आपले अमलनेर ची ओळख साने गुरुजी आहे. त्यानी जगावर प्रेम करा अशी मानवतेची शिकवण दिली.. अशा अमलनेर मध्ये हिंसा गुन्हेगारी वाढणे. म्हणजे आपली प्रगती थांबवणे आहे.म्हणून हिंसा व गुन्हेगारी प्रवृत्ती पासून आपण दूर राहिले पाहिजे असे सांगितले.तसेच चेतन सोनार यांनी सदिच्छा दिल्या. अविनाश पाटील यांनी विचार व शांततामय प्रबोधन कृती वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असे सांगितले.
उपस्थित होते
या कार्यशाळेत अमळनेर , चोपडा , भडगाव, चाळीसगाव, जळगाव,जामनेर, धुळे,शहादा ,शिंदखेडा अशा विविध भागातून नागरिक सहभागी झाले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. दिपक लाबोळे यांनी समतेची गाणी घेतली.
या दोन दिवशीय कार्यशाळेस अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. कार्यशाळा संचलन दर्शनाताई पवार व आभार प्रदर्शन किशोर महाजन यांनी केले.तर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, पाठीराखे यांनी परिश्रम घेतले.
जातीय धार्मिक – सलोखा राखण्याचा व वाढविण्याचा. निर्धार करीत कार्यशाळेचा समारोप झाला..