मी शरद पवारांसोबतच. शहांना भेटल्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण..

24 प्राईम न्यूज 7 Aug 2023
देशाचे गृहमंत्री अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचे सांगितले जात होते, पण या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. एखाद्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला, ते बरोबर नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना फटकारले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.