मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब कारभार..

अमळनेर (प्रतिनिधी) चौकशी सुरू असताना अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जारी केले. मंत्री पाटील यांच्या या अजब कारभारावर उच्च न्यायालयानेही आश्चर्यच व्यक्त केले व त्यास स्थगिती दिली. मर्जीतल्या अधिकाऱ्याला पदावर आणण्यासाठी भाजप समर्थक आमदारांनी तक्रार केली तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खास चौकशीची शिफारस केली, असा धक्कादायक आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आता तर या अधिकाऱ्याला निलंबित केल्याचीही माहिती आहे.