ना अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळताच भाजपात गेलेल्यांची घर वापसी..

अमळनेर (प्रतिनिधी) राजकारण हे नेहमीच सत्ता केंद्रित असल्याने अमळनेर तालुक्याला अनिल पाटील यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळताच अनेकांनी भाजपमधून घर वापसी सुरू केली आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. आता आता राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला आहे. त्यात अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांचा ही समावेश असून मंत्रिमंडळात त्यांना ही मंत्रिपद मिळाल्याने अमळनेर तालुक्यात पहिल्यांदा लाल दिवा मिळाला. त्यामुळे आता राष्ट्रवादी मधून भाजपात गेलेल्यांची घर वापसी होत आहे त्यात तालुक्यातील सात्री येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे व पाडळसरे येथील सरपंच सचिन पाटील हे भाजप मधून घर वापसी राष्ट्रवादीत परतले आहेत. आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.