स्वातंत्र्यदिनानिमित्त पालिकेतर्फे आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन..

.
एरंडोल (प्रतिनिधि) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी माटी मेरा देश या
उपक्रमाअंतर्गत एरंडोल नगरपालिकेतर्फे उद्या (ता.९) पासून विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात
आलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच मेरी माटी मेरा देश या
उपक्रमाअंतर्गत पालिकेतर्फे उद्यापासून सात दिवस विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले आहे.उद्या (ता.९) सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर
चौकातील शंभर फुटी तिरंगास्थळी पंचप्राण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे.गुरुवार (ता.१०) सकाळी दहा पालिकेच्या कर्मवीर अभ्यासिका
सभागृहात विरोंको वंदन आणि कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.शुक्रवारी
(ता.११) सकाळी दहा वाजता पालिकेच्या अभ्यासिकेत राज्यस्तरीय वक्तृत्व
स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.शनिवारी (ता.१२) गांधीपुरा भागातील भवानी
माता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत अमृत वाटिका,वृक्षदिंडी,आणि
वृक्षारोपण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी (ता.१४)
सकाळी मरिमाता मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल.तसेच
अकरा वाजता पालिका कार्यालयातील पातांगानावरील शिलाफलकाचे उदघाटन करण्यात
येईल.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सकाळी पालिकेत ध्वजारोहण करण्यात येवून
कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.पालिकेने स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमास
नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास
नवाळे यांनी केले आहे.