गोंडगाव येथील झालेल्या बालिकेवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ सकळ मराठा समाजातर्फे मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग….

एरंडोल( प्रतिनिधि) गोंडगाव येथील बालिकेवर झालेला अत्याचार व झालेली तिच्या हत्याप्रकरणी तसेच खडके येथील बालगृहातील मुलींवर झालेला अत्याचार या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ येथे ८ ऑगस्ट रोजी सकळ मराठा समाजातर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती नागरिक, यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सदर मोर्चा तहसील कार्यालयात नेण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व सकळ मराठा समाजाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे मनोज मराठे गणेश मराठे सुभाष मराठे अमोल मराठे रामकृष्ण मराठे यांनी केले.यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दोन्ही घटनांच्या तीव्रधिकार करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सदर मोर्चाची सुरुवात गांधीपुरा भागातील होळी मैदानापासून होऊन बुधवार दरवाजा मेन रोड भगवा चौक मारवाडी गल्ली अमळनेर दरवाजा नागोबा मढी महात्मा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गे जाऊन तहसील कार्यालयावर मोर्चाची सांगता झाली.
गोंडगाव तालुका भडगाव येथील चिमुकली कल्याणी संजय पाटील तिच्यावर हत्याचार होऊन तिचा अमानुष खून करण्यात आला. या घटनेचा निषेध निवेदनात करण्यात आला असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश मार्फत या घटनेची चौकशी व्हावी व न्यायालयात हा खटला चालवण्यासाठी एडवोकेट उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना देविदास मराठे, मनोज मराठे ,रामचंद्र मराठे विठ्ठल मराठे राजेंद्र पाटील शिवाजी मराठी पि के पाटील लक्ष्मण पाटील, योजना पाटील रवींद्र पवार, रवींद्र महाजन प्राध्यापक मनोज पाटील विजय महाजन अमित पाटील माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन , राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, माजी नगरसेवक डॉक्टर सुरेश पाटील, अभिजीत पाटील, डॉक्टर राजेंद्र देसले,राजेंद्र शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी रवींद्र मराठे भूषण मराठे महेश मराठे समाधान मराठे अनिल मराठे पंकज मराठे, सुभाष मराठे, अतुल मराठे, पद्माकर मराठे. यांनी परिश्रम घेतले..