गोंडगाव येथील चिमुकलीवर अमानुषकृत्य करुन निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्या, केसेसचे कामकाज विधीतज्ञ अॅङ उज्वल निकम यांचेकडे देण्यात यावी..

सकल मराठा समाज भगिनी यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) गोंडगाव (ता. भडगाव) येथील चिमुकलीवर अमानुषकृत्य करुन निघुन खून करणाऱ्या आरोपीला
फाशीची शिक्षा करावी अशी मागणी सकल मराठा समाज भगिनी यांनी केली आहे.

यासंदर्भात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोंडगाव (ता. भडगाव) येथील चिमुकलीच्या हत्येची सी. आय. डी. मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सदर केस जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावी या केसेसचे कामकाज विधीतज्ञ अॅङ उज्वल निकम यांचेकडे देण्यात यावी व पिडीत कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी, आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी कुठल्याही दबावाला बळी न पडता चौकशी करुन पिडीत बालिकेस न्याय मिळवून द्यावा
अशी मागणी केली. निवेदनावर प्रतिभा नितीन मराठी कविता दिलीप मराठे ,मालू संजय पाटील, उज्वला रमेश मराठे, मनीषा संजय मराठे, पल्लवी अनिल मराठे, वंदना सुनील मराठे, शैला सुनील मराठे, भारती रवींद्र मराठे, सुरेखा एकनाथ मराठे, दिव्या योगेश मराठे, ममता गजानन मराठे, लता संजय मराठे, कल्पना नितीन मराठे, कल्पना नारायण मराठे, कविता पियुष पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.