नितेश राणेंना जातीवाचक विधान भोवणार..

24 प्राईम न्यूज 9 Aug 2023
आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे आमदार नितीश राणे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. पनवेल सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊ न शकल्याने नितेश राणेंना तातडीने दिलासा मिळू शकला नाही. राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दलित शब्द वापरून बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या.