“रोटरी क्लब अमळनेर ला 12 डिस्ट्रिक्ट अवार्ड तर ताहा बुकवाला यांना बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड देवून सन्मानीत.. “

अमळनेर( प्रतिनिधि ) रोटरी क्लब अमळनेरला 2022-23 या वर्षांत केलेल्या शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबंद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 कडून 12 मानांकन देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष व डिस्टिक ऑफिसर रो.कीर्ती कुमार कोठारी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या वर्धा येथील

डीइव्हेंट सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या अवार्ड वितरण कार्यक्रमात एकुण 12 विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले. हे सन्मान रोटरी ईन्टरनॅशनल डायरेक्टर रो.अशोक महाजन व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डाॅ आनंद झूनझनूवाला याच्या हस्ते करण्यात आले, अवार्ड स्विकारण्यासाठी रो. किर्तीकुमार कोठारी अध्यक्ष 2022-23, रो.ताहा बुकवाला सेक्रेटरी 22-23, रो. अभिजित भांडारकर पास्ट प्रेसिडेंट, रो.देवेद्र कोठारी क्लब सेक्रेटरी 2023-24 उपस्थित होते. सन 2022-23 या काळात केलेले विविध समाज उपयोगी कार्य उत्कृष्टरित्या केले यात ट्रॉफी फाॅर बेस्ट ईन्टरॅक्ट एक्टिव्हिटी, अनयुझवल एक्टिव्हिटी साठी डिस्ट्रिक्ट अवॉर्ड, रोटरी इंटरनॅशनल कडून क्लब सायटेशन 2022-23, डिस्टिक टी आर एफ सिल्व्हर साईटेशन अवॉर्ड, सर्वीस टु युथ अवॉर्ड, पब्लिक रिलेशन अवॉर्ड, अपलीफ्टमेन्ट ऑफ वूमन अवॉर्ड, नॅचरल कॅल्यामिटी अवॉर्ड, बेस्ट फेलोशिप अवॉर्ड, लिटरसी प्रमोशन हे अवार्ड, क्लब सेक्रेटरीचे उल्लेखनीय कार्य केल्याबंद्दल रो.ताहा बुकवाला डिस्ट्रिक्ट बेस्ट सेक्रेटरी सफायर अवार्ड देण्यात आले.रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या गव्हर्नर सपोर्ट साठी रो.अभिजीत भांडारकर यांना गव्हर्नर स्पेशल सायटेशन देवून सन्मानीत करण्यात आले. अमळनेर रोटरी क्लब ने डिस्ट्रिक्ट म्हधुन अवार्ड, सन्मान मिळवण्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल अमळनेर रोटरी क्लब चे सर्व सिनियर व सर्व मेम्बरांनी कोतुक केले व शुभेच्छा दिल्या. या प्रोत्साहना मुळे या पुढेही अशीच समाज उपयोगी कार्य करण्याची शक्ती मिळाली हि भावना सर्व मेम्बरांनी व्यक्त केली.