बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लंपास…

एरंडोल(प्रतिनिधि) येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ५० हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना नऊ ऑगस्ट रोजी दुपारी २.५५ ते ३.०० वाजेच्या दरम्यान घडली धाडसी चोरीमुळे एकच खडबड उडाली.
एरंडोल येथे संम्येक इंग्लिश स्कूल मधील शिक्षक उज्वल सिंग विजयसिंह पाटील हे यांनी शाळेचे बांधकाम चालू असल्याने ठेकेदाराला पैसे देण्यासाठी भारतीय स्टेट बँक एरंडोल शाखेतून बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन लाख रुपये काढले. ती रक्कम दुचाकीच्या डिक्की ठेवून ते एम एच १९ बी व्ही ५२८८ व अजून दोन लाख रुपये काढण्यासाठी एचडीएफसी बँकेत गेले त्या ठिकाणी बँकेसमोर दुचाकी उभी करून बँकेत आत गेले व पैसे काढून परत आले असता डिकी उघडून पाहिल्यावर त्यात फक्त ५० हजार रुपये आढळून आले बाकीचे दोन लाख५० हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने लंपास केले तेव्हा पाटील यांनी एचडीएफसी बँकेत जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे बघितले असता एक इसम त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे काढताना दिसत होता.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील लोहार संतोष चौधरी अनिल पाटील मिलिंद कुमावत अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत..