स्वातंत्र्य दिनानिमित्त अमळनेरात 15 ऑगस्टला रंगणार “इंनडिपेंडन्स डे सेलिब्रेशन”
-विविध स्पर्धांचे भव्य आयोजन शो जज म्हणून येणार पूजा शेंडगे व पुष्पा ठाकूर.

0

अमळनेर (प्रतिनिधि)-स्वातंत्र्य दिनानिमित्त अमळनेरात येत्या 15 ऑगस्टला “इंनडिपेंडन्स डे सेलिब्रेशन”चे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शो जज म्हणून महाराष्ट्र कलारत्न पुरस्काराने सन्मानित असलेल्या पूजा शेंडगे व खान्देशी कलाकार पुष्पा ठाकूर यांची मुख्य आकर्षण म्हणून उपस्थिती लाभणार आहे.रमाई कोचिंग क्लासेस आणि जित स्टुडिओ अमळनेर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून सदर कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी भुवन, स्वामी नारायण मंदिराच्या मागे अमळनेर येथे होणार आहे.

या होतील स्पर्धा,,, सदर सेलिब्रेशन अंतर्गत निबंध स्पर्धा(विषय-युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज,थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले,राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतोय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर,आम्ही लेकीं जिजाऊ सावित्रीच्या) आदी विषय असतील.तर चित्रकला स्पर्धेसाठी हम सब एक हे आणि मेरा भारत महान हे विषय असणार आहेत.तसेच सामान्य ज्ञान तसेच गीत गायन नृत्य स्पर्धाही होणार आहेत.या स्पर्धा 5 ते 21 वर्षापर्यंत वेगवेगळ्या गटासाठी होणार असून स्पर्धेची वेळ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वेगवेगळ्या वेळेत असणार आहे. सदर स्पर्धेसाठी खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डॉ अनिल शिंदें,राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या सदस्या सौ रिता भुपेंद्र बाविस्कर,वर्ल्ड डिजिटल डिटोक्स च्या उत्तर महाराष्ट्र अंबेसिडर सौ राजश्री कल्याण पाटील व अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी सदर स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी जित संदानशिव मोबा-9370025220,प्रीती संदानशिव 7385505025 यांचेशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!