विना वाद्य विना जल्लोष मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत विश्व आदिवासी गौरव दिन केला साजरा.

0

अमळनेर ( प्रतिनिधि ) मि पारधी नाही, मी भिल्ल नाही, मी पावरा नाही, मी तडवी नाही मी फक्त आदिवासी आहे असे म्हणत आज एकलव्य संघटना महाराष्ट्र, आदिवासी एकता परिषद भारत, एकलव्य

भिल्ल समाज संघटना, आदिवासी पारधी विकास परिषद, व लोक संघर्ष मोर्चा या संघटनांनी एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने महिला पुरुष

या वेळी चोपडा नाका पैलाड पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, समशेरसिंग पारधी चौक, पाचपावली मार्गे जि.प. विश्राम गृह येथे भव्य रॅली निघाली यात लहान मुलांसह हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते महिला व युवक यांची संख्या लक्षणीय होती
या रॅली चे शासकीय विश्राम गृहाच्या आवारात रूपांतर सभेत झाले
सभेचे प्रमुख वक्ते लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे होत्या या वेळी मा.आ. शिरीष दादा चौधरी सह आदिवासी नेते राज साळवी, सुमनबाई साळवी, रणजीत शिंदे सर, आनंद पवार, संदिप घोरपडे सर, एडव्होकेट ललीता पाटील, बन्सीलाल भागवत गुरूजी, अशोक बिर्हाडे सर, रियाज शेख, रोशन मावळे, यांनी मणिपूर बाबत व जागतिक आदिवासी दिवस बाबत मनोगत व्यक्त केले
आदिवासी मुलगी रेखा पवार व वसुंधरा ताई लांडगे यांनी क्रांतीसुर्य बिरसा आबांवर आदिवासी गीत गायन केले,
सभेनंतर प्रतिभाताई शिंदे यांच्या सोबत सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील अत्याचार बाबत निवेदन देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात गेल्यावर तेथे निषेध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
अमळनेर प्रांत — यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले व आदिवासींच्या समस्या ही सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले
सर्व संघटना एकत्रित येण्यासाठी लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पन्नालाल मावळे सह गुलाब बोरसे, आनंद पवार, मधुकर चव्हाण, आप्पा दाभाडे, रावसाहेब पवार, विनायक सोनवणे, पिंटू पारधी, भुरा पारधी, कविता पवार, आंबा बहिरम, सधाकर पवार, नरेश चव्हाण, भैया सोनवणे, अविनाश नगराळे, भगवान संदानशिव, गणेश चव्हाण, गोरख चव्हाण, किरण सोनवणे, करण पारधी, हेमंत दाभाडे हिंमत पारधी यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला व कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!