राष्ट्रवादी महिला काँग्रेस
कडून हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
ऑगस्ट क्रांती दिन..

24 प्राईम न्यूज 10 Aug 2023
9 ऑगस्ट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा महिला शहराध्यक्षा स्वातीताई कांबळे व पक्षाच्या पदाधिकार्यांनी भारतातील शूर शहीदांना आदरांजली अर्पण केली. हुतात्मा स्मारकाला

आज.सौजन्य अभिवादन.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष साकिब मोमीन, भिवडी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई कांबके यांच्या वतीने गेल्या 9 वर्षांपासून ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारकावर पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन केले. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत छोडोचा नारा दिला आणि येथूनच भारत मातेला मुक्त करण्याची मोहीम सुरू झाली, परिणामी भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. ऑगस्ट क्रांती यावेळी महिला शहर उपाध्यक्षा सबिना नूरअली अन्सारी, शमीम निसार अन्सारी, ललिता पांचाळ, अनिसा समीर पटेल सुलभा जाधव, कांता जाधव, रेश्मा सय्यद, आईसा अन्सारी, राजेश चव्हाण, वारिस बाबा, देवानंद गौड अल्ताफ रंगरेज आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने भारताच्या शूर शहीदांना अभिवादन.