आ.फारुख शाह यांचे हस्ते परिवहन कार्यालय इमारत बांधकामाचा शुभारंभ…

धुळे (प्रतिनिधि) धुळे शहरासाठी नागरिकांची अडचणी बघता अनेक प्रशासकीय इमारती या भाड्यांच्या जागेवर होते त्या पोटी शासनाला लाखो रुपये भाडे द्यावे लागत होते ही परिस्थिती बघता आ.फारुख शाह यांच्या दूरदृष्टीपणामुळे शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय बांधकामासाठी आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे त्याची परिनीती म्हणून आज कुंडाणे रोड येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय याच्या बांधकामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
धुळे शहरातील बहुतेक सरकारी कार्यालय हे भाड्याच्या जागेवर असून त्यासाठी शासनाकडून लाखो रुपये या कार्यालयाच्या भाड्यासाठी देण्यात येते. आ.फारुख शाह यांनी शहरातील नागरिकांची अडचण बघता यापूर्वी आदिवासी प्रकल्प कार्यालय असो किंवा एमआयडीसी प्रशासकीय इमारत तसेच एमआयडीसी अग्निशामक केंद्र व धुळे जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राज्य उत्पादन शुल्क कार्यालय ईमारत यांच्या बांधकामासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे.आ.फारुख शाह यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासकीय इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आलेला आहे.त्याचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडून कामास प्रारंभ होणार आहे..नागरिकांच्या मुलभूत गरजांबरोबरच नागरिकांना प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची आ.फारुख शाह यांच्या दूरदृष्टीपणामुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आज उपलब्ध होत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बांधकामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आ.फारुख शाह यांचे आभार मानले यावेळेस आ.फारुख शाह यांचेसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील,डॉ. दीपश्री नाईक,डॉ.बसुराव पवार,निजाम सैय्यद,इकबाल शाह,आसिफ शाह मुल्ला,फिरोज शाह,आसिफ पोपट शाह,अजहर सैय्यद,अरबाज शाह,सलमान अन्सारी, छोटू शाह, अकिब अली,समीर शाह,गोलू शाह,लालाभाई अन्सारी, इत्यादि उपस्थित होते.