एरंडोल येथे शासकीय आय टी आय मधील शिक्षकाने केला महीला शिपायाचा विनयभंग..!

एरंडोल ( प्रतिनिधि ) येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक चे शिक्षक नारायण शंकरराव सरनाईक यांनी २०/११/२०२० ते ३१/०५/२३ दरम्यान नोकरीवर असलेल्या महीला शिपायाला जातीवाचक भाषा वापरून व शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा गुन्हा एरंडोल पोलिस स्टेशन ला गुरूवारी रात्री उशिरा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.