डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा.

24 प्राईम न्यूज 11 Aug 2023 इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंच पुतळा एमएमआरडीएकडून उभारण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याला राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली.आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा
इंदू मिलमधील स्मारकात उभारण्यात येणारा ४५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. यात चबुतऱ्याची उंची १०० फूट असून पुतळ्याची उंची ३५० फूट असणार आहे. या स्मारकाच्या कामाला २०१८ मध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली असून आतापर्यंत या प्रकल्पातील पायाभूत इमारतीचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पुतळ्यासाठीच्या चबुतऱ्याचे २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.