मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग..

24 प्राईम न्यूज 11 Aug 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईत इमर्जन्सी लैंडिंग करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने राजभवन येथून टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच हा तांत्रिक बिघाड झाला. यानंतर मुंबईच्या जुहू येथील पवनहंस तळावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचेइमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडानंतर मुख्यमंत्री रस्तेमार्गे दरेगावाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने त्यांच्या मूळ गावी दरेगावी जाणार होते.