जळगाव चा उर्दू शिक्षणाचा खरा सर सय्यद हरपला..
डॉक्टर अमानउल्लाह शाह यांना विविध क्षेत्रातील प्रमुखांनी वाहिली आदरांजली..

0

जळगाव ( प्रतिनिधी )

जळगाव नगरीत उर्दू शिक्षणाचा पाया रोवणारे व सर्व प्रथम मुस्लिम मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करणारे व त्याचसोबत सामाजिक व शहा बिरादरीसाठी कार्य करणारे जिल्हा सामान्य रुग्णालया

तील माजी लॅब टेक्निशियन डॉक्टर
अमानउल्लाह शाह यांना जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत असणारे पदाधिकारी यांनी एका कार्यक्रमांतर्गत श्रद्धांजली अर्पित केली.
या आदरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहर काझी व दारुल कजा चे न्याय प्रमुख मुफ्ती अतिकुर रहमान होते.

आदरांजली सभेत बोलताना फारुक शेख

डॉक्टर शाह यांनी जळगाव शहरात मुस्लिम मुलींसाठी उर्दू शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, त्यानंतर बाहेर गावाहून शिक्षणा साठी येणारे विद्यार्थी व नोकर वर्गासाठी अमिनिया होस्टेलची सुरुवात केली. त्याच सोबत आपल्या शहाबिरादरीची ओळख भिक मागणे ही संपुष्टात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यानंतर ईकरा एज्युकेशन सोसायटी स्थापनेसाठी पुढाकार घेतला, पूर्वीपासून अस्तित्वात असलेली अँग्लो उर्दू हायस्कूलचे सुद्धा ते संचालक होते.
सहा मुलींपासून सुरू केलेली मुस्लिम मुलींची शाळा आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बारावीपर्यंत सुरू असून त्यात आठशे विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे.
मृत्यू समयी पर्यंत ते अंजुमन खिदमत ए खलक एकेके या शैक्षणिक संस्थेचे डॉक्टर शहा हे अध्यक्षस्थानी होते, इकराचे मेडिकल कॉलेज चे चेअरमन, शाह बिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते अशा थोर व्यक्तीचा वयाच्या ८३ वर्षी निधन झाल्याने त्यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही अशी खंत उपस्थितांनी व्यक्त केली.

त्यांच्या कार्याचा यांनी केला उहापोह

मुफ्ती अतिक, मुफ्ती हारून नदवी,मजीद जकेरिया, एजाज मलिक, डॉक्टर ताहेर शेख,फारुक शेख अब्दुल्ला, अमीन बादलीवाला, इक्बालशाह, शिक्षक वृंदातर्फे अकील ब्यावली, माजी शिक्षिका शाहेदा (मालेगाव) शेख, मुख्याध्यापिका सौ तन्वीर जहा शेख कुटुंबियातर्फे डॉक्टर शरीफ शाह, डॉक्टर एजाज शहा, आदींनी डॉ शाह यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकला.

कार्यक्रमात जाहिद शाह, मोहसीन शाह,लईक शाह, इकबाल शाह ऑपरेटर, खालीद बागवान, वहाब मलिक,अकील शहा, असलम सर, हमिद जनाब, आरिफ शेख व एकेके शाळेचे शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरबेज शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक मुश्ताक भिस्ती यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!