व्हाईट हाऊस ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांची माजी आमदार अनिल गोटे यांची सदिच्छा भेट..

धुळे (प्रतिनिधि) धुळे शहराचे कार्यसम्राट माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांनी धुळे शहरातील अल्पसंख्यांक परिसरातील हजार खोली सागर हॉटेल जवळील व्हाईट हाऊस ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून घेतले….
धुळे येथील हजार खोली

परिसरातील व्हाईट हाऊस या सोशल ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री गोटे साहेब यांच्याकडे त्यांच्या परिसरातील दैनंदिन अडी अडचणींविषयी व येऊ घातलेल्या निवडणुकांच्या रणनीती विषयी चर्चा केली.तसेच यावेळी उपस्थितांना श्री गोटे साहेब यांनी आश्वासित केले की मी कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलो गेलो तरी माझ्या सर्व धुळेकर सर्व जाती धर्मातील नागरिकांना मी कधीही अंतर दिले नाही व येणाऱ्या काळामध्ये सुद्धा माझी भूमिका ही विकासात्मक दृष्टिकोनातूनच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे आणि त्याच उद्दिष्टाने माझ्या तुमच्या सारख्या सर्व धुळेकर बंधूंना या छोटेखानी बैठकीच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की मला कोणीही आपल्या समस्यांविषयी कधीही संपर्क करावा मी नेहमी त्यांच्या साठी आधीही जसा कार्य तत्पर होतो आणि यापुढेही देखील कार्य तत्पर असणार आहे. अशी ग्वाही श्री गोटे यांनी दिली असता उपस्थित व्हाईट हाऊस ग्रुपच्या सदस्यांनी देखील अण्णासाहेब आम्ही ही आपल्या सोबतच या विकासाच्या कार्यात सहभागी आहोत असे अभिवचन दिले.
यावेळी या छोटेखानी बैठकीमध्ये व्हाईट हाऊस ग्रुपचे रफीक भाई पंप वाले,सलीम लंबू,कालू दादा,आसिफ भाई टायर वाले,शरीफ मामू, मंजरअली खतीब,अकबर अली सैयद सर,पठान दादा,जावेद मिस्त्री,खलील सर,आसिफ मिर्जा साहब,आबिद मन्यार,अरशद भाई,जाविद भाई किराना वाले,डॉ सोमनाथ चौधरी आणि परिसरातील सर्व नागरिक तसेच वाईट हाऊस ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तसेच या बैठकीमध्ये आसिफ भाई टायर वाले,हबीब शेख, शरीफ मामू ,जावेद भाई किराणावाले यांनी आपले विचार व्यक्त केले. अशी माहिती जेष्ठ अकबर अली सय्यद सर यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे यांनी प्रसिद्ध केली.