जळगावचे फारुक शेख यांना “रहेबर ए मिल्लत” तर सावद्याचे हारून शेख यांना “समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित..

जळगाव ( प्रतिनिधी )
जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील नव्याने स्थापन झालेल्या सोहेल खान मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे पहिल्या वर्षीचा सामाजिक सेवेत उत्कृष्ट कार्याबद्दल जळगाव जिल्हा मणियार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांना “रहेबर ए मिल्लत” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर सावद्याचे हारून शेख यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बाबत रविवारी “समाज रत्न” पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर अन्सार खानहे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे अली अंजुम रिझवी, जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष मजहर खान, ईदगाह ट्रस्ट चे अनिस शाह,शिकलगार फाऊंडेशन चे अध्यक्ष अन्वर खान, सोहेल फाऊंडेशन चे सोहेल खान,अय्युब सर,शकील शेख, सय्यद बशारत अली मारुल,डॉक्टर शकील सर यावल, जाफर अली मुक्ताई नगर,जफर खान आदींची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम शनिवारी सावदा येतील खाजा नगर हॉल मध्ये संपन्न झाला.
सोहेल खान फाउंडेशन तर्फे सोहेल खान, अय्युब सर, युसुफ शहा, फरीद शेख, निसार अहमद, शेख कलीम, कमरोड्डिन शेख उस्मान, शेख अनिस आदींनी फारुक शेख व हारून शेख यांना ट्रॉफी, शाल व बुके देऊन गौरविले.