आ.फारुख शाह यांचे हस्ते जामचा मळा परिसरात काँक्रीट रस्ते कामाचा शुभारंभ..

धुळे (अनिस खाटीक)
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 जामचा मळा अंतर्गत काँक्रीट रस्ते व गटर काम करणे या कामाचे 50 लाख रुपये कामाचे शुभारंभ आमदार यांचे हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 19 भागात सुमारे पाच वर्षांपूर्वी एक सुद्धा रस्ते व गटार नव्हती तसेच या प्रभागात मूलभूत सुविधा याचा अभाव होता परंतु आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने व या प्रभागाचे नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण प्रभागात आज रोजी 75 टक्के रस्ते व गटारीचे कामे झाले असून या प्रभागात आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी एक दमडीच्या सुद्धा निधी उपलब्ध करून दिला नव्हता त्यामुळे या भागाची स्थिती फार भयानक होती या प्रभागात पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत होते पावसाळ्याचे पाणी साचल्यामुळे लोकांना चालणे सुद्धा दुराप्रास्त होते. तसेच गटार नसल्यामुळे सर्व पाणी परिसरात पसरत होते आ.फारुख शाह यांनी या परिस्थितीच्या विचार करून या चार वर्षात या प्रभागात रस्ते गटार व पाईपलाईन साठी शेकडो कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला आहे आ.फारुख शाह यांनी शहराच्या विविध भागात आजपर्यंत रस्ते गटार पाईपलाईन व शहराच्या सुशोभीकरणासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी आज पर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे नागरिकांची मूलभूत सुविधा साठी व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून शहराच्या कसा विकास होईल यावर आमदार साहेब यांचे प्रयत्न असून आज प्रभाग क्रमांक 19 येथे जा आमच्या मळा अंतर्गत 50 लाख रुपये कामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या भागातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांच्या सत्कार केला व आभार मानले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी आ.फारुख शाह यांचेसोबत हाफिज दानिश मौलाना,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक आमिर पठाण,नगरसेवक गनी डॉलर,सलीम शाहडॉ. दिपश्री नाईक, अनिस शाह,डॉ.बापुराव पवार,प्यारेलाल पिंजारी,मौलाना शकील,शरीफ पठाण, फुझेल आझमी,अयाझ शेख,आसिफ शाह, शहजाद मंसुरी,नजर पठाण,अजहर सैय्यद,इरफान शेख, जीड्या पहिलवान,हलीम शमसुद्दिन,अल्ताफ मिर्झा, शगिर पिंजारी,एजाज सैय्यद, चांद पिंजारी,शहजाद मणियार,जमील खाटीक,शोएब मुल्ला,माजीद पठाण, वसिम मंसूरी,छोटू मच्छीवाले,गफ्फार शेख, इंजि.अफसर शाह आदी उपस्थित होते.