वंचित बहुजन आघाडी पत्रकार संघा तर्फे उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन, -पत्रकार संदीप महाजन यांना मारहानीचा निषेध..

अमळनेर( प्रतिनिधि )
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील संदीप महाजन पत्रकार यांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन

वंचित बहुजन आघाडी अमळनेर तर्फे उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याच पत्रकारा ला मारहाण होत आहे. महाजन यांना जीवे मारण्याची धमकी शिंदे गटाचे पाचोरा आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे . आताचे सरकार हे डोळ्याला पट्टी घालून मुंग गिळून बसल्याचे सर्वत्र दिसत आहे त्यातच त्यांच्यावर राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी आहे अशा सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकार मधील पाचोरा जिल्ह्यात आमदार किशोर पाटील यांनी सत्तेचे बाजू मांडणाऱ्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना खालच्या भाषेचा अश्लील भाषेचा वापर करून अशी वाक्य व भाषा वापरणे योग्य नाही संदीप महाजन पत्रकार यांनी माझ्या जीवितास व माझ्या परिवारास काय झाल्यास आमदार किशोर पाटील हे जबाबदार राहतील असे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी दिवसाढवळ्या कार्यकर्तांद्वारे रस्त्यात मार झोड करण्यात आली आहे संविधान विरोधी असल्याने हल्लेखोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्यामार्फत जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहेयांच्या निवेदन देताना तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे तालुका उपाध्यक्ष बापूराव भामरे तालुका प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब पवार तालुका संघटक मोहन बैसाणे तालुका कार्याध्यक्ष दिनेश बिराडे शहर महासचिव अहमद पठाण शहर अध्यक्ष संदीप सैंदाणे पत्रकार सुरेश कांबळे समाधान मराळे पत्रकार उमाकांत ठाकूर आदी उपस्थित होते…