खासदार शरद पवार आणि उप मुख्यमंत्री यांची गुप्त बैठक..

24 प्राईम न्यूज 13 Aug 2023. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी सायंकाळी पुण्यात एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क भागातील निवासस्थानी हे दोघे एकमेकांना भेटले. या दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत राजकारणासह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या चर्चेचा तपशील रात्री उशिरापर्यंत बाहेर आला नाही.
भेट झाल्यानंतर शरद पवार हे संबंधित उद्योगपतीच्या निवासस्थानातून बाहेर पडले. काही वेळाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वाहनातून निघून गेले. या वेळी अजित पवारांना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ माजली आहे.