शहीद जवान शहीद पोलीस यांच्या विरमाता वीरपत्नी यांचा व त्यांच्या वारसांचा गौरव व सनमानसोहळा संपन्न..

एरंडोल (प्रतिनिधि)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन वीरो को वंदन या महोत्सव अंतर्गत भारत देशाकरिता बलिदान दिलेल्या स्वतंत्र सैनिक शहीद जवान शहीद पोलीस यांच्या विरमाता वीरपत्नी यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यासाठी एरंडोल नगरपालिकेने मा. आमदार चिमणराव पाटील यांच्या व किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे मार्गदर्शनाखाली
दि 10 ऑगस्ट 2023 रोजी सन्मानसोहळा आयोजित केला होता ..यामध्ये सर्वप्रथम भव्य कवी संमेलन घेण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुप्रसिद्ध कवी आलेले होते. त्यांच्या कविता ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. कविवर्य प्रशांत केंदळे ,कविवर्य निलेश चव्हाण, कविवर्य सदाशिव सूर्यवंशी ,कविवर्य विनोद बागुल, कविवर्य शरद धनगर यांनी त्यांच्या भावस्पर्शी कविता सादर केल्यात. आई वडील , पर्यावरण देशभक्ती अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या..यानंतर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर विभूतींना विनम्र अभिवादन करून एरंडोल शहरातील शहीद जवान शहीद पोलीस यांच्या विरमाता वीरपत्नी यांचा व त्यांच्या वारसांचा गौरव मा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एरंडोल पोलिस स्टेशन चे पीआय साहेब सतीश गोराडे हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एरंडोल न.प.च्या सर्व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. सूत्रसंचालन हितेश जोगी यांनी केले..