एरंडोल येथे पुरुषोत्तम मास निमीत्त अखण्ड हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न..
-पुरुषोत्तम मास म्हणजे पारमार्थिक कार्यासाठी पर्वकाळ
ह भ प विजय महाराज भामरे यांचे काल्याच्या कीर्तनात प्रतिपादन..

0

एरंडोल( प्रतिनिधी) येथे श्रीहरी कृपेने त्रैवार्षिक नियमानुसार यंदाही श्रीगुरु रामदास बाबा वरसाडेकर व वारकरी भूषण श्रीगुरु नामदेव बाबा भामरे रवनजे कर यांचे आशीर्वादाने व ह.भ.प.भीकुताई लढे, यांचे प्रेरणेने तसेच समस्त भाविक भक्त व भजनी मंडळी यांचे सहकार्याने आणि ह. भ. प. विजय महाराज भामरे रवनजेकर, M.A.B.ED (अध्यक्ष, श्री. क्षेत्र सुकेश्वर देवस्थान) यांचे मार्गदर्शनाने भव्य ज्ञान यज्ञ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.काल्याच्या कीर्तनात ह भ प भामरे महाराज यांनी पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना हा पारमार्थिक कार्यासाठी पर्वकाळ असून थोडं जरी पुण्य केले तरी डबल फायदा मिळतो.असे प्रतिपादन करून भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीला कथन केल्या.गौळणी व अभंग गायनातून सर्वश्रोते मंत्रमुग्ध झाले.या सप्ताहात ह.भ.प. संजय महाराज गुरव (फरकांडे )
ह.भ.प.जितेश महाराज (म्हसावद)ह.भ.प.प्रा.सी.एस. पाटिल (धरणगाव)
ह.भ.प.चंद्रकांत महाराज(म्हसावद)ह.भ.प. भागवत महाराज शिरसोली
ह.भ.प.निवृती मोरे,( पोलिस ) पाचोरा
*ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर, चाळीसगांव यांची कीर्तने झाली तर शेवटी
ह.भ.प.विजय महाराज भामरे ( अध्यक्ष, श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान)
यांच्या काल्याच्या कीर्तणाने सांगता झाली. तसेच गायनाचार्य- ह.भ.प.प्रमोद महाराज,बामने कर ,ह.भ.प.कल्याण महाराज,आडगावकर, मृदंगाचार्य – ह.भ.प.अनिल महाराज, बामने कर.यांनी साथसंगत केली तसेच संजय काबरे यांनी महाप्रसाद सेवा केली. तसेच विनोद देशमुख, सुरेश राजधर देशमुख, गणेश देशमुख, भगवान देशमुख व सर्व देशमुख मढ़ी पंचमंडळ यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमात महिला मंडळ व भाविक भक्त उपस्थित होते.व सप्ताह समिति तील सुभाष वाणी, नाना देशमुख, किशोर देशमुख,कौतिक पाटील, नाना भाऊ वायरमन यांनी परिश्रम घेतले.सर्व सहकार्य व अन्नदान करणाऱ्या आणि श्रोते भाविक भक्तांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!