अमळनेर येथील नगरपालिका यांच्या माध्यमातून साफसफाईचे तीनतेरा.. -साफसफाई साठी जनजागृती परिणाम शून्य…

अमळनेर ( प्रतिनिधि )
अमळनेर येथील नगरपालिकेचे वाहन सकाळी कचरा भरण्यासाठी येत असते मात्र गाडीवर एक संगीत म्हटले जाते “गाणे गाडीवाला आया घर से कचरा निकाल “अशा प्रकारे घरातला कचरा त्या वाहनामध्ये टाकला जातो व गटरी मधली घाण रोडावर टाकला जातो त्यामुळे तेथील वातावरण घाण दूषित होऊन तेथे कृष्ण मंदिर असल्या कारणामुळे कायम गटारी मधून काढलेल्या घानीची दुर्गंधी येत असते कचरा रोडावर पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही ती घाण डूकर अस्त वस्त करत राहातात नागरिक या दुर्गंधीच्या कारणामुळे त्रस्त झाले आहे झामी चौक ते वड चौक पर्यंत गटारीवर योग्य प्रकारे साफसफाई होत नाही पीव्हीसी पावडर फवारणी होत नाही यामुळे अनेक प्रकारचे डास होऊन रोगाला आमंत्रण मिळते आरोग्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने योग्य ती साफसफाई करून पीव्हीसी पावडर मारून आरोग्य मुक्त साफसफाई करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.