जळगावच्या माळी समाज सेवा मंडळातर्फे
गुणवंतांचा गुणगौरव सोहळा..

0


जळगाव (प्रतिनिधी)येथील क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने संत सावता माळी प्रगतीशील शेतकरी पुरस्कार , समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच माळी समाज भवन , इंद्रनिल सोसायटी , जळगाव येथे संपन्न झाली . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. भास्कर माळी यांनी भूषविले . विचारमंचावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री. यजुवेंद्र महाजन सर , माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत कापसे , महाराष्ट्र – मध्यप्रदेश – गुजरात माळी समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. निळकंठ महाजन , जि.प. जळगाव चे माजी सदस्य श्री. नानाभाऊ महाजन , दहिवदचे प्रगतीशील शेतकरी श्री. अनिल माळी , दहिवद समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश महाजन , समाजसेवा मंडळाचे सचिव श्री. गोकूळ महाजन सर , नवयुवक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश चव्हाण , महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शशिकला महाजन , कार्यध्यक्षा सौ. कल्पना महाजन उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , संत सावता माळी यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंडळाचे सचिव श्री. गोकूळ महाजन सर यांनी समाज सेवा मंडळाने आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. धनश्री रवींद्र महाजन , कु. पियुषा गिरीष जाधव , श्री. रवींद्र महाजन सर , श्री. गिरीष जाधव सर यांनी केले . कु. भाग्यश्री रवींद्र महाजन हिने सुरेख असे स्वागतगीत म्हटले . श्री. गिरीष जाधव सरांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला .
यावर्षीचा संत सावता माळी प्रगतीशील शेतकरी पुरस्कार दहिवदचे प्रगतीशील शेतकरी श्री. अनिल भूकन माळी ( मगरे ) यांना देऊन गौरविण्यात आले . यावर्षी अधिवेशनात समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले महाराष्ट्र – मध्यप्रदेश – गुजरात माळी समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. निळकंठ महाजन यांचा देखील सत्कार करण्यात आला . त्यानंतर यशस्वी सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले , विविध पदांवर निवड झालेले , यश मिळविणाऱ्या समाजबांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . सेवानिवृत्त लेखाधिकारी श्री. प्रभाकर पांडुरंग महाजन यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल व स्नेहभोजन व्यवस्था करून दिल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला .
इयत्ता १ ली ते १२ वी , पदवी , पदव्युत्तर वर्गात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला . समाज मंडळ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक जोमाने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते , असे मनोगत विद्यार्थीनीने व्यक्त केले .
दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री. यजुवेंद्र महाजन सर यांनी हसतखेळत समाजबांधवांचे उद् बोधन केले . श्री. नानाभाऊ महाजन , श्री. निळकंठ महाजन , दहिवद समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश भिला महाजन यांची देखील मार्गदर्शनपर भाषणे झाली . आभार श्री. विठ्ठल राजोळे सर यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. भास्कर माळी , श्री. गोकूळ महाजन सर , श्री. कांतीलाल महाजन , श्री. विठ्ठल राजोळे , श्री. नानाभाऊ महाजन , श्री. रमेश चव्हाण , डॉ. हिरालाल चव्हाण , डॉ. राजेंद्र महाजन , श्री. बाजीराव महाजन , श्री. भूषण महाजन , तसेच क्षत्रिय माळी समाजसेवा मंडळ , महिला मंडळ , नवयुवक मंडळ यांचे सभासद , उपस्थित समाजबांधव यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!