अजित पवार यांच्याशी भेटीवर | शरद पवार यांचे स्पष्टीकरण.. -या भेटीचा गाजावाजा कशाला.

0

24 प्राईम न्यूज 14 ऑग 2023 अजित माझा पुतण्या आहे. पुतण्याला भेटण्यात काय गैर आहे. एका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती एखाद्या सदस्याला भेटू इच्छित असल्यास त्याचा गाजावाजा केला जाऊ नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पवार म्हणाले, “काही हितचिंतक माझे मत वळवण्याचा प्रयत्न करीत असले तरी आपला पक्ष भाजपसोबत युती करणार नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या राजकीय धोरणांमध्ये भाजपशी सख्य कोणत्याही प्रकारे जुळू शकत नाही.राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी हे एकदम स्पष्टच करतो की माझा पक्ष भाजपसोबत जाणार नाही. काही हितचिंतक जरी माझे मन वळवण्याचा निकराचा प्रयत्न करीत असले तरी आपला पक्ष कदापि भाजपसोबत जाणार नाही. आमच्यापैकी काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यानंतर काही हितचिंतक आमच्या भूमिकेत बदल झाला आहे का, याची चाचपणी करू पाहात आहेत, असे पवार यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!