भिवंडी शांतीनगर डोंगरपाडा येथे पाण्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू. -स्वाती कांबळे राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष यांचे प्रशासनाला साकडे..

24 प्राईम न्यूज 14 Aug 2023. भिवंडी शांतीनगर डोंगरपाडा येथे 29 जुलै 2023 रोजी पाण्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी

मृत्यू झाला परंतु अद्याप भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे त्या परिसरातील खड्ड्याला वाल कंपाऊंड बांधण्यात आले नाही किंवा त्या ठिकाणी मुरूम टाकून भरणा देखील करण्यात आला नाही मुलांचे पालक व परिसरातील महिलानी मोठ्या संख्येने स्वाती कांबळे महिला राष्ट्रवादी शहर जिल्हा अधक्ष भीवंडी यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तेथील मनपा उपायुक्त सचिन माने व फॉरेस्ट अधिकारी निकम आव्हाड यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी असलेल्या खड्डा त्वरित भरणी करण्यात यावी तसेच महानगरपालिका व फॉरेस्ट यांच्याकडून मृतांच्या पालकांना निधी देण्यात यावा त्वरित कारवाई न झाल्यास असे न झाल्यास दोघांवरती सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला..