राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपने केंद्रीय कृषी मंत्रीपदाची दिली ऑफर..

24 प्राईम न्यूज 14 Aug 2023 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपने केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्याचबरोबर नीती आयोगाचे उपाध्यक्षपदही देऊ केल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला आहे.चव्हाण यांनी सांगितले की, पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील उपस्थित होते.
शरद पवार यांना नीती आयोगाचे उपाध्यक्षपद तसेच केंद्रात कृषी मंत्रीपद देण्याची ऑफर भाजपने दिली. मात्र, माझ्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दिलेली ऑफर शरद पवार यांनी स्वीकारलेली नाही.