मेरा देश मेरी मिट्टी अंतर्गत तिरंगा चौकात शिला फलकाचे अनावरण. -लोकांच्या मनात देशभक्ती रुजविण्याची गरज. -मंत्री अनिल पाटील.

अमळनेर( प्रतिनिधि ) स्वातंत्र्य वीरांचा,क्रांतिकारकांचा जनतेला विसर पडत चालला होता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा देश मेरी मिट्टी अभियान काढले आहे. मात्र लोकांच्या मनात देशभक्ती

रुजवण्यासाठी चळवळ उभरणे

तसेच वैयक्तिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मदत व आपत्ती पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले.
मेरा देश मेरी मिट्टी अंतर्गत नगरपरिषदेने तिरंगा चौकात उभारलेल्या शिला फलक अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रोग्रेसिव्ह हेरा इंग्लिश मिडीयम स्कूल व शोबए मदरिसा , यांच्या तर्फे ३५० फूट तिरंगा रॅली तिरंगा चौक ते राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत काढण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ बी एस पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हजर होते. सकाळी सात वाजता १०५ फूट तिरंगा फडकवण्यात आला. सुरुवातीला शाहरुख सिंगर ,मुन्ना शेख ,अपेक्षा पवार यांनी देशभक्तीपर गीते गायली. माजी आमदार स्मिता वाघ यांनी देखील आपल्या मनोगतातून पंतप्रधान मोदी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष चंदू परदेशी , अर्बन बँक संचालक प्रवीण जैन , माजी नगरसेवक संजय पाटील ,प्रवीण पाठक ,शीतल देशमुख ,राजेंद्र यादव ,उमेश वाल्हे ,प्रा सुरेश पाटील ,मुख्तार खाटीक , ऍड यज्ञेश्वर पाटील ,इम्रान खाटीक , नरेंद्र संदानशीव ,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ,संजय चौधरी , विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर , बांधकाम अभियंता दिगंबर वाघ , अमोल भामरे ,युवराज चव्हाण , हैबत पाटील ,सोमचंद संदानशीव , प्रसाद शर्मा ,महेश जोशी ,फयाज पठाण हजर होते.ज सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.