एरंडोल न्यायालयातर्फे ’’आंतरराष्ट्रीय युवा दिन’’ साजरा

एरंडोल( प्रतिनिधि)
एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक १४ ऑगष्ट, २०२३ रोजी डि.डि.एस.पी. महाविदयालय, एरंडोल येथे '' आंतरराष्ट्रीय युवा दिन '’ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात "Anti Ragging Laws” या कायदेविषयक विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याअनुषंगाने दिनांक १४ ऑगष्ट, २०२३ रोजी डि.डि.एस.पी. महाविदयालय, एरंडोल येथे अॅड श्री. विलास के.मोरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बी. ए. तळेकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती एरंडोल यांनी "Anti Ragging Laws” या कायदेविषयक विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती पल्लवी एन.पाटील मॅडम तर आभारप्रदर्शन प्रा.श्री.एन.बी.गायकवाड सर यांनी केले. सदर कार्यक्रमास श्रीमती बी. ए. तळेकर, दिवाणी न्यायाधीश एरंडोल, श्री.विशाल श्रावण धोंडगे, दिवाणी न्यायाधीश एरंडाेल, अॅड. श्री. व्ही.एन.पाटील, अॅड. श्रीमती प्रतिभा पाटील, अॅड श्री.व्ही.के.मोरे व इतर विधीज्ञ तसेच उपप्राचार्य श्री. आर.एस.पाटील सर, श्री. एन.बी.गायकवाड सर व इतर शिक्षकेतर कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी श्री. शरद पाटील, तालुका विधी सेवा समितीचे सहाय्यक श्री. नितीन व्ही. बेडिस्कर व पो.काॅ. धर्मेंद्र ठाकूर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस अंदाजे २५० विदयार्थ्यांची उपस्थिती होती.