राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच अजित पवार यांच्या गटात.

24 प्राईम न्यूज 15 Aug 2023राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पुण्यात एका उद्योगपतीच्या निवासस्थानी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली होती. यात याबाबत चर्चा झाल्याचे समजते. आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात दरम्यान, जयंत पाटील बद्दल विचारले असता शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांच्या बंधूंना ईडीची नोटीस आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. सत्तेचा गैरवापर करून अशा नोटिसा आधीही नेत्यांना देण्यात आल्या व ते भाजपमध्ये जाऊन बसले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत करण्यात येत आहे, पण मला खात्री आहे की जयंत पाटील यांची वैचारिक भूमिका स्पष्ट आहे