एरंडोलला स्वातंत्र्यदिनी प्रोफेशनल क्रिकेट लिग स्पर्धा उत्साहात संपन्न..

एरंडोल ( प्रतिनिधि )प्रेरणादायी उपक्रम-आ. चिमणराव आबा पाटील-सिव्हील इंजिनिअर्स असोसिएशनचे आयोजन
एरंडोल (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने एरंडोल सिव्हील इंजिनिअर्स असोसिएशन आयोजित प्रोफेशनल क्रिकेट लिग स्पर्धांचे आयोजन 15 ऑगस्ट 2023 रोजी एरंडोलला दोन दिवस करण्यात आले होते.
एरंडोलच्या रा. ति. काबरे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर सदर स्पर्धांचे उद्घाटन तालुक्याचे आमदार चिमणराव आबा पाटील आणि रा. ति. काबरे विद्यालय संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरदचंद्र काबरा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सतिष गोराडे, ज्येष्ठ सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष शालिग्रामभाऊ गायकवाड, मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सदर क्रिकेट स्पर्धांसाठी आठ संघांनी सहभाग नोंदविला. यात इंजिनिअर्स, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, पोलिस, न. पा. ग्रामीण रूग्णालय, कोर्ट यांचा समावेश होता. दोन दिवस चाललेल्या आकर्षक स्पर्धा पाहून आमदारांसह शहरवासिय, क्रिकेटप्रेमी भारावले. सदरप्रसंगी एरंडोल ग्रामीण रूग्णालय संघ विजयी ठरला तर शिक्षक संघ उपविजेता ठरला. विजेता, उपविजेता संघास ट्रॉफी, सन्मानपत्रासह बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र आ. चिमणराव आबा, सतिष गोराडे, विकास नवाळे, शालिग्रामभाऊ गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. सदरप्रसंगी डॉ. इब्राहिम बोहरी, ग्रामीण रूग्णालयाचे बिपीन यांना विशेष सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मृदूल अहिरराव, भूषण बियाणी, ज्ञानेश्वर महाजन, महेश पाटील, ऋषीराज महाजन, भूषण महाजन, विकास महाजन, दिपक महाजन, कृष्णा लोहार, राहिल मुजावर, लोकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. सदर स्पर्धा प्रेरणादायी असल्याचे आ. चिमणराव आबांनी कौतूक करतांना सांगितले. यावेळी मान्यवरांसह शिक्षक राकेश पाटील सरांनी देखील मनोेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूषण महाजन यांनी तर आभार भूषण बियाणी यांनी मानले.