मिरची पावडर वापरुन महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी मुददेमालासह जेरबंद.. -आझादनगर पोलीसांची कारवाई..

धुळे ( अनिस खाटीक)
धुळे जिल्हयात मागील काही दिवसापासुन महामार्गावर प्रवास करणा-या ईसमांना त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकुन गावठी बनावटीचे
पिस्तुलचा वापर करुन धमकी देवून जबरदस्तीने त्यांचेकडुन रोख रक्कम, मोबाईल व मोटार सायकल हिसकावुन पळुन जाणे असे गुन्हे घडत होते त्याबाबत मा पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड सो यांनी सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना निर्गमीत केलेल्या होत्या.

दिनांक १५/०८/२०२३ रोजीचे २३.३० ते दिनांक १६/०८/२०२३ रोजीचे सकाळी ०६.०० वा पर्यंत आझाद नगर पोलीस ठाणे हद्यीत गिंदोडीया चौक येथे नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आलेले होते. नाकाबंदी व कोम्बींग दरम्यान पोनि श्री नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, तिन इसम हे एका पांढ-या रंगाच्या एक्टीवा मोसा क्र एम एच १८ बी पी ६३०८ हिवर बसुन पारोळा चौफुलीकडुन गिंदोडीया चौकाकडे येणार असुन त्यांचे कब्जात गावठी बनावटीचे पिस्तुल आहे. नमुद प्रमाणे बातमी मिळालेनंतर पोनि देशमुख यांनी आझादनगर पोलीस ठाणेकडील सपोनि पाटील व शोध पथकातील कर्मचारी यांना नमुद बातमीची खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केलेवरुन सपोनि पाटील व पथकाने गिंदोडीया चौक येथे दुचाकी वरील १) शेखर दत्तु वाघमोडे, वय २३ वर्षे रा भोकर, ता जि धुळे २) चेतन जिभाऊ पाटील, वय ३० वर्षे रा भोकर, ता जि धुळे ३) विकास संजय केदारे, वय २५ वर्षे रा पश्चिम हुडको, साईबाबा मंदीराजवळ, चाळीसगाव रोड, धुळे अशा तिन इसमांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तोल तसेच एक जिवंत काडतुस मिळुन आले म्हणुन सदर इसमांना ताब्यात घेवुन आझादनगर पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचे विरुदथ आझादनगर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुन्हा रजि नं २१८/२०२३ भादंवि कलम ३४ सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणेगुन्हा दाखल केलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास मा पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख हे करीत आहेत.
नमुद गुन्हयाचे तपासात असताना आरोपीत यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे,
१) दिनांक ०९/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास नगावबारीच्या पुढे पोददार इन्टरनॅशनल शाळेजवळील मुबई आग्रा महामार्ग क्रमांक ३ वर एका इसमास आवाज देवुन त्यास थांबवुन तु भुषण ला का मारले असे बोलून त्याचे डोळयात मिरीचीची पावडर टाकुन त्याचे शर्टच्या खिशातुन एक मोबाईल काढुन घेवुन त्यास ढकलुन देवुन त्याचेकडील सुपर स्प्लेंडर मोटार सायकल ही जबरदस्तीने हिसकावुन घेतलेली होती असे सांगितलेने पश्चिम देवपुर पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत पश्चिम देवपर येथे भाग ५ गुन्हा रजि नं २३४ / २०२३ भादंवि कलम ३९४,३४
प्रमाणे गुन्हा दिनांक १०/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.
२) दिनांक १३/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास नगावबारी येथुन चोरलेल्या सुपर स्प्लेंडर या दुचाकीवर ट्रीपल सिट बसुन गरताड गावचे शिवारातील तिखी फाटा येथे येवुन एका इसमास दुचाकीवरुन खालीपाडुन त्याचेवर गावठी बनावटीचे पिस्तोल रोखुन त्यास शिवीगाळी व दमदाटी करून त्याचेकडुन एक मोबाईल, एक होडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल व रोख रक्कम असे जबरदस्तीने हिसकावलेले होते असे सांगितलेने मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुन्हा रजि नं २१७ /२०२३ भादंवि कलम ३९२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दिनांक १४/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.
३) दिनांक १४/०८/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास तिखी फाटा येथुन चोरलेल्या युनिकॉर्न मोटार साकलचा वापर करुन साक्री रोड हायवे वरील मोराणे गावचे बस स्टॉप जवळ एक पुरुष व एक महीला यांना गावठी पिस्तोलचा धाक दाखवुन त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकुन त्यांचे जवळील दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र असलेली काळया मन्यांची पोत व रोख रक्कम असे बळजबरीने हिसकावुन चोरी करून पळुन गेलेलो होतो असे सांगितलेने धुळे तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत धुळे तालुका पोलीस ठाणे येथे भाग ५ गुन्हा रजि नं ४७३ / २०२३ भादंवि कलम ३९२, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दिनांक १५/०८/२०२३ रोजी दाखल असलेचे दिसुन आले.
नमुद आरोपीत यांचेकडुन पश्चिम देवपर पोलीस ठाणे, धुळे तालुका पोलीस ठाणे व मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले असुन त्यांचेकडुन९) आझाद नगर पोस्ट कडील दाखल गुन्हयातील मिळुन आलेला गावठी बनावटीचे पिस्तोल, एक जिवंत काडतुस तिन मोबाईल व एक्टीवा मोटार सायकल असा एकूण १,०६,०००/-रुपया
५) पश्चिम देवपुर पोस्टे येथे दाखल गुन्हयातील एक सुपर स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच २८ ए. ए ०५.०३. एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३७,०००/- रु रकमेचा ३) मोहाडी उपनगर पोस्ट येथे दाखल गुन्हयातील एक होता कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल वाहन
क्रमांक एम एच ०६ एकी ७९९३ व एक रिअल मी कंपनीचा मोबाईल असा एकूण ७७,०००/- रकमेचा ४) धुळे तालुका पोस्ट येथे दहातील दोन मोबाईल सोन्याचे मंगळपायांची चीन दोन वाटा असा एकूण २४,५००/- रु रकमेचा असा एकूण २,४४,५००/- रुपये रकमेचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आला आहे. समुद्र आरोपी यांना दिनांक १६/०८/२०१३ रोजी मा न्यायालयासमोर हजर केले असता मा न्यायालयाने दिनांक १८/०८/२०१३ रोजी पावेतो पोलीस फोटडी रिमांड दिलेली आहे.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री संजय धारकुंड सो मा अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळ या सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पीस रेडी सो. तसंच योनि नितीन देशमुख सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील सहा फौज प्रकाश माळी, पांडवा/योगेश शिरसाट, पाटना मुक्तार मन्सुरी योगी का पोना/संदीप फडरे, पोना/योगेश शिंदे, पोकों/अनिल शिपी पोका/अझहरोदीन शेख प/सचिन जगताप यांनी केलेली आहे..