कावड यात्रा भक्तीमय वातावरणात.. अमळनेरात शिवभक्तांचे जोरदार स्वागत..

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर येथील कावड यात्रेत सुभाष अण्णा चौधरी यांच्यासह साने नगर भागातील शेकडो भाविक यात्रेत सहभागी झाले होते

सकाळी आठ वाजता जळोद येथील तापी नदी पात्रातून जल घेऊन निघालेले शिवभक्त सायंकाळी पाच वाजता शहरात पोहोचले रस्त्यात शिवभक्तांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर अमळगाव येथे श्रीराम चौधरी यांच्याकडून या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अमळनेरला पोहोचल्यावर शिवभक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात आले दरम्यान कावड यात्रेनिमित्त शहरात जोरदार बॅनर बाजी करण्यात आली होती श्रावण महिना सुरू झाला असून हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो या महिन्यात केलेली शिवाजी अत्यंत लाभदायक असते अशी धार्मिक श्रद्धा आहे पवित्राच्या या श्रावण महिन्यात भगवान शिवाजी भक्त कावड यात्रा आयोजित करून त्यात शेकडो भाविक भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी जळो ते अमळनेर असा पायी प्रवास करतात तापी सारख्या पवित्र नदीचे भरलेले पाणी भगवान शिवाला अर्पण केले जाते एखाद्याने खऱ्या भक्तीने महादेवाच्या पिंडीवर तांब्याभर जल जरी अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांची छाप पूर्ण करतात अशी आहे त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात शिवभक्तांकडून कावड यात्रा काढली जाते या कावड यात्रेत सुभाष अण्णा, डॉ अनिल शिंदे,विक्रांत पाटील,सुरेश पाटील, सह असंख्य भाविक उपस्थित होते..